पंढरपूर/प्रतिनिधी;
गेल्या सात महिन्यापासुन राज्यात लॉकडाऊन आणि अनलॉक सुरु आहे. राज्याची अर्थव्यवस्था डळमळीत झाली. यात उद्योग व्यवसाय बंद झाले तर काही उद्योग बंद होण्याच्या मार्गावर आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना वाढीव वीज बिल मुळे अजुन संकट निर्माण झाले आहे. शरद पवार हे राज्य सरकारचे मार्गदर्शन म्हणून काम पाहतात. वाढू वीज बिलाचा योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर वीज बील माफ करावे, अन्यथा पंढरपूरमध्ये शरद पवार यांना पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा संतोष कवडे यांनी दिला.
__________________________________________📢
(Advertise)
__________________________________________
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार मंगळवार २९ सप्टेंबर रोजी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, हभप रामदास महाराज जाधन ( कैकाडी) तर पवार कुटुंबाचे विश्वासू समजले जाणारे राजुबापु पाटील या तिघांचे कोरोनामुळे निधन झाले असल्याने त्यांच्या कुटुबाके सांत्वनपर भेट घेणार आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राज्य सरकारचे मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. गेल्या सात महिन्यापासुन राज्यात लॉकडाऊन आणि अनलॉक सुरु आहे. पंढरीत विठ्ठल मंदिर बंद असल्यामुळे व्यापार्याचे हाल सुरु आहेत. त्यात राज्यात वीज बिलाचा मुद्दा मोठा झाला आहे. ज्यादा बिलामुळे नागरिक त्रस्त आहे. शरद पवार यांनी मध्यस्थी करुन योग्य तो मार्ग लवकर काढ़वा, अन्यथा पंढरपूर येथे शरद पवार यांना कार्यकर्ताकडून विरोध करण्याचा इशारा यावेळी दिला.प्रमुख मागण्या घरगुती वीज धारकांना वीज बिल मध्ये ५०% सुट मिळावी, व्यवसायिक वीज धारकांना युनिट प्रमाणेच वीज बिल भरुन घेण्यात यावे, स्थिर आकार रद्द करावा, व्याज व व्याजाची थकबाकी माफ करावे, समायोजीत रक्कम माफ करावी, वहन आकार माफ करावा, वीज शुल्क २१% व १६% माफ करावी, अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत. जर काही तोडगा नाही निघाला तर कोणीही विज बिल भरु नये. असे आवाहन समाजसेवक संतोष कवडे यांनी केले आहे या होणारा परीनामास शासन जबाबदार राहील.
0 Comments