हो ! सुशांत ड्रग्स घेत होता; श्रद्धा कपूरनंतर साराने देखील दिली कबुली


 ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणसह सारा अली खानची देखील चौकशी करण्यात आली. यावेळी श्रद्धा कपूरनंतर साराने देखील सुशांत ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे. सुशांतसिंह राजपूतशी केदारनाथच्या शुटींग दरम्यान जवळीक निर्माण झाली होती. 

सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर वीड ओढायचा अशी कबुली साराने दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा अली खान हिने ड्रग्ज घेतल्याचा आरोप फेटाळून लावला. कोणत्याही ड्रग्ज पेडरलला ओळखत नाही, असे चौकशी दरम्यान साराने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले.
_________________________________________
📢
(Advertise)
_________________________________________

फेब्रुवारी २०१८ मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुशांतसिंह राजपूतशी जवळीक निर्माण झाली, अशी सारा अली खानने कबुली दिली. चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती सुशांतच्या घरी ‘कॅपरी हाऊस’ मध्ये बर्‍याच वेळा सुशांतलाही भेटायची. साराने सुशांतसोबत अनेकदा लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर गेलो असल्याचेही सांगितले आहे. आपण काही काळ सिगारेट ओढली, पण कधीही ड्रग्ज घेतलेले नाही. सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर वीड ओढायचा, असे साराने चौकशीत सांगितले.

Post a Comment

0 Comments