कट्टर हिंदुत्त्ववादी व भागवताचार्य वा.ना.उत्पात यांचे कोरोनामुळे निधन....



पंढरपूर/प्रतिनिधी;

स्वा. सावरकर यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक व कट्टर हिंदूवादी विचारसरणीचे पुरस्कृते वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांचे कोरोना उपचार घेत असताना पुणे येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले, ते ८० वर्षाचे होते. 
वा.ना.उत्पात यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. विठ्ठल मंदिरात २५  त्यांनी  भागवत आणि रुक्मिणी स्वयंवर कथेचे वाचन केले आहे. 

त्यांना भागवताचार्य म्हणून वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहेत. वाचनालयाची स्थापना त्यांनी केली होती. वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची गरीब विद्यार्थ्यांची सोय केली होती. वा.ना.उत्पात यानी १८ पुस्तके लिहाली आहेत. त्यात त्यांनी सावरकार यांच्या साहित्याचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणावर केला. वा.ना.उत्पात यांनी बरीच वर्ष पत्रकार म्हणून काम केले आहे. 
__________________________________________
📢
(Advertise)
__________________________________________
  
स्वतंत्र्यावीर दामोदर  सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला. स्वतंत्र्यावीर सावरकर साहित्य संमेलनेचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले आहे. वा.ना. उत्पात यांनी आयुष्यभर अध्ययनाचे काम केले. पंढरपुराच्या राजकारण, समाजकारण, आध्यामिक क्षेत्रात भरीव योगदान राहिले आहे. वा.ना.उत्पात हे असे अचानक गेल्यामुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.
  
पंढरपुराचे कोरोना आजारामुळे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्र्वादीचे नेते राजाबापू पाटील, ह.भ.प रामदास महाराज जाधव, भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांचे कोरोनामुळे निधन झाले.

Post a Comment

0 Comments