आ.ऋतुराज पाटील यांचा बावडा सर्पमित्रांशी हॉस्पिटलमधून संवाद ; सर्पमित्रांना साहित्य वाटप

आमदार ऋतुराज पाटील यांनी बावडा  रेस्क्यू फोर्सच्या सर्पमित्रांशी व्हिडिओ मीटिंग द्वारे संपर्क करून त्यांच्या कामाचे कौतुक केले.यांच्यावतीने या सर्पमित्रांना स्टिक, स्टील पाईप,बॅग,बॅटरी तसेच शूज,ग्लोव्हज हे साहित्य देण्यात आले. या साहित्यामुळे या सर्पमित्रांचा उत्साह दुणावला आहे. 

     पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा बावडा येथे बावडा रेस्क्यू फोर्सची स्थापना केली आहे. यामध्ये दहातून अधिक सर्पमित्र आहेत. कोणाचाही फोन आला तर कोणत्याही प्रकारचा साप असेल तर तो पकडून कोणतीही इजा न होता सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम हे सर्वजण अत्यंत धाडसाने करत आहेत.

आ.पाटील हे सध्या कोरोनावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.पण  या सर्व सर्पमित्रांची सुरक्षितता लक्षात घेऊन  आ.पाटील यांनी हे साहित्य दिले.

या सर्पमित्रांशी व्हिडिओ  कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना आ.पाटील यांनी सांगितले की , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेस्क्यू फोर्सने गणेशोत्सवात प्रबोधनाचे काम केले.   सर्व सर्पमित्र करत असलेले काम कौतुकास्पद आहे. या सर्वांच्या सामजिक कार्यात नेहमीच खंबीर पाठबळ देऊ. 

  सर्पमित्र अशांत मोरे यांनी संगीतले की, गेले आठ वर्षांपासून आम्ही हे काम करतोय.पण यासाठी लागणारे आवश्यक साहित्य आ.पाटील यांनी दिल्याने आम्ही आमचे  काम नेटाने पुढे सुरू ठेऊ.

    आमदार ऋतुराज पाटील हे रेस्क्यु फोर्सच्या उपक्रमांवर  पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत.त्यांनी सर्पमित्रांना लागणारे साहित्य त्वरित दिल्याबद्दल  बावडा रेस्क्यू फोर्स तर्फे  आ.पाटील यांचे मानसिंग जाधव यांनी  आभार मानले.

      हे सर्व साहित्य  रेस्क्यू फोर्सचे समन्वयक मानसिंग जाधव, तानाजी चव्हाण, प्राचार्य डॉ.महादेव नरके,हेमंत उलपे यांनी सर्पमित्र अशांत मोरे,निलेश पिसाळ,चेतन बिरंजे ,सुजित जाधव,अक्षय निकम  टोनी घाटगे ,सतीश गायकवाड, शुभम कांबळे,सौरभ कांबळे,सुजित पिसाळ यांच्याकडे दिले.



Post a Comment

0 Comments