संजय राऊत म्हणजे नॉटी बॉय' ; भाजपची खोचक टीका




अभिनेत्री कंगना राणावत हिला 'हरामखोर' म्हटल्यामुळं वादात सापडलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर खुलासा केला आहे. मात्र, त्या खुलाशावरूनही भाजपनं त्यांना घेरलं आहे. कंगनाला 'नॉटी गर्ल' म्हणायचं होतं, असं राऊत यांनी म्हटलं होतं. त्यावरून भाजपनं त्यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे.

मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारी कंगना राणावत हिच्यावर शिवसेनेनं टीकेची झोड उठवली आहे. मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटत असेल आणि मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर चंबूगबाळं आवरून आपल्या राज्यात निघून जा, असं संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. त्यावर राऊतांनी मला धमकी दिली. मी मुंबईत येणार, अडवून दाखवा, असं आव्हान कंगनानं दिलं होतं. 

त्यामुळं संतापलेल्या संजय राऊत यांनी तिच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. तिला 'हरामखोर' असं हिणवलं होतं. त्यावरून गदारोळ उठल्यानंतर खुलासा करताना मला कंगनाला 'नॉटी गर्ल' आणि 'बेईमान' म्हणायचं होतं असं ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments