मुरगूड येथे गांजा विक्रेत्याला अटक.....


कोल्हापूर/प्रतिनिधी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर पोलिसांनी बेकायदेशीर गांजा, भांगेच्या गोळ्या आणि गुटखा विक्री करणाऱ्या एकाला एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून गांजा भांग, गुटखा आणि रोख रक्कम असा ३ लाख ८ हजार ९७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अभिजीत बळीराम पाटील (रा. बोरवडे तिट्टा, मुरगुड) असे त्याचे नाव आहे.

बेकायदेशीर रित्या गांजा विक्री केली जाते हि पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना दिल्या होत्या. त्यानुसार काल (शनिवार) रात्री उशिरा पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, प्रशिक्षणार्थी पोलिस साहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. धिरजकुमार बच्चबनोथ मुगेंद्रलाल यांच्यासह पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. 

_________________________________________

📢 पत्ता-: पहिला मजला, शाहूपुरी तिसरी गल्ली, पत्की हॉस्पिटल समोर, कोल्हापूर.

(Advertise)
_______________________________________
त्यावेळी अंमली पदार्थांसह गुटख्याची विक्री करणाऱ्या अभिजीत पाटील याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दीड किलो गांजा, भांगेच्या गोळ्याची १९ पाकिटे, गुटखा तसेच सुगंधी तंबाखूची ५ पोती आणि दोन लाख ४६ हजार ८० रुपयांची रोकड असा सुमारे ३ लाख ८ हजार ९७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

सरवडे तालुका राधानगरी येथील अनिल तावडे याच्याकडून घाऊक दरामध्ये गांजाची खरेदी करून त्याची विक्री करत असल्याची कबुली अभिजित पाटील यांनी पोलिसांना दिली त्यामुळे पोलिसांनी अभिजीत पाटीलसह त्याला गांजाचा पुरवठा करणाऱ्या अनिल तावडे यांच्या विरोधात ही  मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये  सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस हवालदार अजित वाडेकर, पोलीस नाईक महेश गवळी, अनोलम पोवार, ओंकार परब, रणजीत पाटील आदींनी सहभाग घेतला

Post a Comment

0 Comments