वादळी पावसामुळे वाठार मधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

लाजरस कदम/ वाठार 
  
काल रात्री अचानक पणे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे अनेक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे शेतीतील इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांचे ऊसाचे पिक जमीन दोस्त झाले आहेत. 

शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झालं आहे, तसेच मोठ मोठी झाडे ही पडली आहे, कुंभार गल्ली न ३ जवळील वडाचे झाड ३०० ते ३५० वर्षापूर्वीचे झाड ही जमीन दोस्त झाले आहे.
__________________________________________
ठिबक सिंचन, स्प्रिंकलर आणि कोकोपीट, मल्चिंग पेपर तसेच शेडनेट आणि बरच काही..!! शेतऱ्यासाठी लागणारे सर्व साहित्य एका छताखाली...!!!
केदारलिंग ऍग्रो,  पेठ -वडगाव,  जि.-कोल्हापूर  c📱-9561303045
(Advertise)
__________________________________________

गावातील विजेचे खांब व वायरी तुटून पडल्या आहे, काही विजेच्या मोटारींचे नुकसान झाले. वादळी वारे व पावसामुळे ऊस या पिकांचे नुकसान झाले असून असून पिकांवर विविध प्रकारचे रोग पडण्याची भीती व्यक्‍त होत आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी महसूल व कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments