खूप शेतकऱ्यांच्या मनांत नेहमी प्रश्न असतो की, आपल्या सातबाऱ्यावर जितकी शेतजमीन नमूद केली आहे, तितकी प्रत्यक्षात दिसत का नाही, असा प्रश्न शेतकऱ्याच्या मनात येतो. त्यामुळे मग आपल्या जमिनीवर शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची शासकीय पद्धतीनं मोजणी करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो.
आता आपण शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय कागदपत्रं लागतात याविषयी सर्व माहिती सरकारच्या अर्जाच्या नमुन्यात आहे.
मोजणीसाठीचा अर्ज आणि कागदपत्रे
शेतजमिनीच्या हद्दीबाबत शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात.
या अर्जाचा नमुना सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
जमीन मोजणीचे साधारणपणे तीन प्रकार पडतात. यात साधी मोजणी जी ६ महिन्यांच्या कालावधीत केली जाते, तातडीची मोजणी ३ महिन्यांमध्ये, तर अतितातडीची मोजणी २ महिन्यांच्या आत केली जाते.
एक हेक्टर क्षेत्रावर साधी मोजणी करायची असल्यास १ हजार रुपये, तातडीच्या मोजणीसाठी २ हजार रुपये, तर अतितातडीच्या मोजणीसाठी ३ हजार रुपये शुल्क आकारलं जातं. त्यामुळे मग किती कालावधीत मोजणी करून हवी आहे, यानुसार शेतकरी तशी माहिती "कालावधी" या कॉलममध्ये लिहू शकतात.
0 Comments