आयपीएलच्या तेराव्या सीजनच्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हेन पंजाबवर मात केली आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरु असलेल्या या मॅचमध्ये अखेर दिल्लीने बाजी मारली.
प्रथम दिल्लीने पंजाबला १५८ रन्सचं लक्ष्य दिलं होतं. दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबच्या टीमने पहिल्यांदा खराब कामगिरी केली. मात्र पंजाबच्या मयांक अग्रवालने एक बाजू धरून ठेवत पंजाबला पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरच्या चेंडूत मॅच टाय झाली.
सुपर ओव्हरमध्ये पंजाबने दिल्लीला अवघ्या तीन रन्सचं टारगेट दिलं. पंजाबने २ रन्स करत २ विकेट्स गमावल्या. चुटकीसरशी दिल्लीने सुपर ओव्हरच्या तीन रन्सचं टारगेट पूर्ण करत मॅच खिशात घातली.
आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. सीजन सुरु झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आयपीएलचा थरार अनुभवायला मिळाला. यंदाच्या हंगामाची पहिलीच सुपर ओव्हर किंग्ज इलेव्हेन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झाली.
0 Comments