दुर्लक्षित कोरोना यौद्धा; प्रामाणिक रिक्षाचालक नितीन पिसे



आज जगभरात कोरोनाचा कहर चालू आहे, भारतात हि थैमान चालू आहे, प्रत्येक जण स्वतःचा जीव सांभाळून एकमेकांना समजून घेऊन मदत करत आहेत.

यामध्ये आघाडीवर आहेत पेठ वडगाव मधील रिक्षाचालक नितीन पिसे... एक सामान्य माणूस मनात आणले तर काहीही करु शकतो यांची प्रचिती येत आहे. स्वतः चा जीव धोक्यात घालून मोठ्या उत्साहात ते काम करतात.

एक सामान्य रिक्षा व्यवसायीक नितीन पिसे हा कोरोना संशयित रूग्णाना स्वँब देण्या साठी घेऊन जाणे, पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणे, त्याच्या घरच्यांना मदत करणे हि कामे मोठ्या हिरीरीने करतात. त्याच्या ह्या धाडशी वृत्तीला सलाम ते पार पाडत ह्या कार्यास मनापासून धन्यवाद.

ह्या भयंकर महामारीच्या काळात एवढी जमेल तेवढी मदत करत आहे, तरी कोणाला मदत लागल्यास संपर्क साधण्याचे आव्हान त्यांनी केले आहे.

नितीन पिसे ९७६२९८७३७३

Post a Comment

0 Comments