'विद्यार्थीद्रोही आणि असंवेदनशील' शिवाजी विद्यापीठ कर्मचारी


कोरोना महामारीमुळे आधीच विद्यार्थ्यांची प्रचंड शैक्षणिक हानी झाली आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थी गेले सहा महिने तणावात आहेत. या पार्श्वभूमीवर येत्या १ ऑक्टोबर पासून अंतिम वर्षाची परीक्षा होणार असताना शिवाजी विद्यापीठ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आठवडाभर 'लेखणी बंद' आंदोलन सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी पुकारले आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या परिक्षांवर व त्यांच्या भवितव्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

◆ आंदोलनाने परीक्षांचे निकाल थांबले  व अंतिम वर्ष परीक्षांमध्ये अडचणी

◆ संकट काळात देखील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या असंवेदनशील, अप्पलपोटी व विद्यार्थीद्रोही भूमिकेवर समाजातून तीव्र रोष

◆ गलेलठ्ठ पगार असणारे आणि कोरोना काळात घरात बसून पगार चालू असणारे व कामातही गतिशील नसणारे हे कर्मचारी व अधिकारी
__________________________________________
📢
(Advertise)
_________________________________________

◆ करोडो लोक बेरोजगार होत असताना आणि विद्यापीठातच शेकडो लोक कंत्राटी असताना विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर पाय ठेवून सातवा वेतन आयोगाचा हट्ट

◆ या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शासनाने निलंबनाची कारवाई करावी अशी विद्यार्थ्याच्यातून संतप्त मागणी

◆ लेखणी व अवजार बंद करून फुकटचा पगार घेत आहेत त्यामुळे आंदोलन काळातील हे दिवस रजा समजण्यात यावी अशीही मागणी होत आहे

Post a Comment

0 Comments