गेल्या अनेक दिवसांपासून माळशिरस तालुक्यात मळोली गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, अनेक गावांतील घरामध्ये पाणी शिरल्याचे जीवनावश्यक वस्तूंचेही अगणित नुकसान झाले असल्याने राज्य सरकारने या नुकसानीची तत्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीची मदत द्यावी व पाहणीनुसार पीक नुकसानभरपाई मंजूर करावी अशी मागणी मळोली ग्रामस्थानी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे केली.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचा माळशिरस तालुक्यातील मळोली गावासह सोलापूर जिल्हा पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन नुकसान ग्रस्त भागाचा दौर्यावेळी मळोली गावाची पावासामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली या पाहणीत पालकमंत्री भरणे यांनी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी काही सामाजिक संस्थानी नागरिकांना पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तुचे वाटप केले.
गेल्या तीन-चार दिवसांपासून सलग झालेल्या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तर, १५० हून अधिक जनावरे या पावसाची बळी ठरली आहेत. प्रामुख्याने पंढरपूर, माळशिरस, सांगोला, दक्षिण सोलापूर, बार्शी, मंगळवेढा या तालुक्यांना त्याची सर्वाधिक झळ बसली. पावसाचे पाणी घरात शिरल्याने लोकांचे स्थलांतर करणे, पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ते बंद करण्याची वेळही या पावसाने आणली. आता या भागातील नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने मदत देण्याची तयारी राज्य सरकार करत असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.
या ठिकाणी सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांसमवेत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पाहणी करून सांगोला तालुक्यातील महूद येथे दौरा आहे. महूद वरून पंढरपूर तालुक्यातील गार्डी कासेगाव असा दौरा करून कासेगाव येथे पाहणी केली.
0 Comments