संभाजी आरमारचे महापालिका उपायुक्तांना निवेदन


सोलापूर : संभाजी आरमारच्या वतीने सोलापूर महापालिका उपआयुक्त धनराज पांडे यांना शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची दुर्गंधी आणि अस्वच्छते बाबत निवेदन देण्यात आले.

 सोलापुर शहरातील सार्वजनिक मुताऱ्यांची अवस्था बिकट बनलेली आहे,तेथील अस्वच्छता, दुर्गंधी आणि साचलेल्या घाणी मुळे रोगराईस आमंत्रण मिळत असून, सध्या याचा वापर नागरिक नाईलाजास्तव करत आहेत,कोरोनामुळे अगोदरच भयभीत असणारे नागरिक या अस्वच्छतेमुळे कोरोना पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महानगरपालिकेने या अगोदर नव्याने आणि पुनर्बांधणी करण्यात आलेल्या तसेच सध्या ई- टॉयलेट शेजारील मुतारी नियमित स्वच्छता न करणाऱ्या आणि ज्यांना या मुताऱ्यांच्या स्वच्छतेचे टेंडर दिलेले आहे, अश्या मक्तेदारावर मानवी आरोग्यास धोका निर्माण केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा व तातडीने शहरातील मुताऱ्यांच्या स्वच्छता बाबत निर्णय घ्यावा,
अन्यथा संभाजी आरमार ला जनतेच्या आरोग्याकरिता आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा देण्यात आला, यावेळी संभाजी आरमार चे जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे,जिल्हासंघटक संजय सरवदे,संपर्क प्रमुख सागर संगवे, प्रभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोतदार, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के,सदस्य बिरु गोरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments