अहमदाबादमधील मणिनगरमध्ये एका पुरुषाने पत्नी मारहाण करत असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. याशिवाय मला सुरक्षा द्यावी, माझ्या जीविताला धोका होऊ शकतो अशी मागणी देखील या व्यक्तीने खोकरा पोलिस स्टेशनमधील पोलिसांना केली आहे.
दोन वर्षांपूर्वी २९ वर्षीय व्यक्तीचा २५ वर्षीय मुलीसोबत लग्न झालं होतं. त्यावेळी पत्नीच्या दारुच्या व्यसनाबद्दल पतीला कोणतीही कल्पना नव्हती. लग्नानंतर ती दारू पिऊन धिंगाणा घालू लागली. पतीने तिची दारूची सवय सोडवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र तिचं व्यसन वाढतंच गेलं. काही दिवसांनी ती सासू सासऱ्यांनाही दारू पिऊन मारू लागली. त्यामुळे त्रस्त तरुणांनी पोलीस स्टेशन गाठलं व तक्रार केली.
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी पत्नीने पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार केली होती. त्यानंतर पत्नी आपल्याला कोणत्याही खोट्या प्रकरणात अडकवू शकते म्हणून पतीने खोकरा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करत सुरक्षा पुरवावी अशी मागणी केलीये.
0 Comments