कोल्हापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरात देखील अशा पद्धतीने जनता कर्फ्यु लावावा अशी मागणी समाजातील नागरिकांकडून होत होती. यासाठीच या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मात्र या बैठकीत काही घटकांनी या निर्णयास विरोध दर्शविल्यामुळे बैठकीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. अखेर सर्वांनी या निर्णयास मान्यता दिल्याने ११ ते १६ सप्टेंबर दरम्यान शहरात जनता कर्फ्यु लागणार हे स्पष्ट झाले.
◆ काय राहणार सुरू
औद्योगिक वसाहती,औषध दुकाने, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, दूध विक्री व बँका सुरू राहतील.
◆ काय बंद राहणार
भाजीपाला, किराणा दुकाने, धान्य दुकाने, मसाला दुकाने इत्यादी
0 Comments