बार्शी : यंदाच्या हंगामात पाऊस पडल्याने शेतात गवताचे प्रमाण वाढले आहे, मजुरी वाढल्याने त्यांना मागणी करत असले तरी आरोग्यास अपायकारक असल्याचे कृषी उपसंचालक रवींद्र माने यांनी म्हटले आहे. बार्शी तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात पावसाचे भुरभुर चालू आहे. पिकांत व बांधावर गवताचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे गवत नष्ट करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने पर्याय मार्गाचा अवलंब शेतकरी करत आहेत, ते आरोग्यासाठी व शेतीसाठी अपायकारक आहे.
वास्तविक तणनाशकाचा वापर जमीन पडीत जमीन बांधावरील गवत कमी करण्यासाठी होणे गरजेचे आहे, मात्र शेतकरी पिकांतर्गत गवत कमी करण्यासाठी त्यांना शकतात वापर करीत असल्याचे दिसून येत आहेत. वारंवार तणनाशकांची फावरणी केल्याने जमीनीचा पोत बिघडतो.
एका दिवसाला स्त्रीला २५० ते ३०० रुपये हजरी तर पुरुषांना ४०० ते ४५० रुपये प्रमाण जास्त असल्याने रानात जास्त तण असल्याने तणनाशकाचा वापर वाढला, असून एकरी १०००-१२०० रुपये येत असल्याने हे वाढल्याचे चित्र आहे. हे सगळं असलं तरी तणनाशकांचा अति वापर हा अपायकारक आहे.
0 Comments