राकेश करमळकर/ आजरा;
गडहिंग्लज चिंचेवाडी येथे विवाह झालेली आजरा तालुक्यातील साळगाव येथे माहेर असलेली महिला प्रसूतीसाठी गडहिंग्लज येथील दवाखान्यामध्ये नाव नोंदवले असता डिलिव्हरी च्या दिवशी दवाखान्यामध्ये दाखल करून घेतले नाही. अखेर या महिलेचे रस्त्यावरच प्रसूती झाली. सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह कि निगेटिव्ह या संभ्रमा मुळे त्या महिलेला गडहिंग्लज येथील कोणत्याच दवाखान्यामध्ये दाखल करून घेतले नाही. सदर महिला आजरा मधील एका दवाखान्याच्या दारात गेली असता तेथेच तिची प्रसूती झाली त्यामुळे आजरा तालुक्यात आरोग्याचा व महिलांच्या प्रसूतीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सकाळी नऊ वाजता या महिलेला प्रसूतीच्या कळा सुरुवात झाल्या असता गडहिंग्लज येथील एका नामांकित रुग्णालयात गेले असता त्या ठिकाणी घेण्यास नाकारण्यात आले. त्यानंतर सदर महिलेस नेसरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेथे सिजरिंग ची सोय नसल्याचे सांगण्यात आले असे कळून येते. त्यानंतर सदर महिलेस आजरा येथील एका दवाखान्यात आणले असता त्या दवाखान्याच्या दारातच त्या महिलेची प्रसुती झाली.
हॉस्पिटलच्या दारामध्ये पडदा लावून तेथील डॉक्टर दाम्पत्याने या महिलेचे नैसर्गिक प्रसूती करत या महिलेने एका चिमुकली जन्म दिला. तब्बल दहा तासानंतर या महिलेची मरण यातनेतून सुटका झाली आणि डॉक्टरांना सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला. आजरा येथील डॉक्टर दाम्पत्य महिला व तिच्या बालीके साठी देवदूत बनले आहेत. त्यानंतर त्या महिलेची व तिच्या बाळाची रवानगी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे करण्यात आली आहे.
0 Comments