कागल तालुक्यामध्ये रविवार पासून दहा दिवस जनता कर्फ्यु



कागल/प्रतिनिधी;

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दि ०४ रोजी आताच कागल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी पदाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे मीटिंग घेतली.त्यामध्ये कागल तालुक्यामध्ये रविवार दिनांक ०६/०९/२०२० ते मंगळवार दिनांक १५/०९/२०२० अखेर दहा दिवस जनता कर्फ्यु पुकारला आहे.

 या काळात फक्त दूध, मेडिकल स्टोअर्स, शेती सेवा केंद्र, सरकारी निमसरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना ओळखपत्र दाखवून जाता येईल, बँका बंद राहतील,ATM सुरू राहील, विनाकारण विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी सक्त सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. कडकडीत बंद पाळून कोरोना हद्दपार करूया, तरी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे.

Post a Comment

0 Comments