शिवसेनेकडून आजरा येथे कंगना राणावतचा निषेध; प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन



राकेश करमळकर/आजरा;
            
सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद  आजरा शहरांमध्ये सुद्धा उमटले. आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने कंगना राणावत हिच्या प्रतिकात्मक पुतळ्याची यात्रा काढून त्याचे दहन करण्यात आले.
        
मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर शी करणाऱ्या कंगना राणावत व तिला पाठीशी घालणाऱ्या भाजप आमदार राम कदमचा व महाराष्ट्र पोलीस यांना बदनाम करणाऱ्या कंगना राणावत चा निषेध करतेवेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक मा .श्री .संभाजी दादा पाटील ,तालुका प्रमुख युवराज पोवार ,शहर प्रमुख ओंकार माद्याळकर ,विभाग प्रमुख दिनेश कांबळे ,उद्योगपती भिकाजी गिलबिले ,उप शहर प्रमुख भिकाजी विभुते ,वाहतूक सेनेचे तालुका प्रमुख राजू बंडगर ,एस टी कामगार सेनेचे संदीप खवरे ,युवा सेना तालुका प्रमुख महेश पाटील ,विशाल बांदेकर ,रोहन गिरी ,संकेत देसाई ,सिद्धार्थ हसबे ,बाळी खोत ,श्रीधर कळेकर ,सुमित देसाई ,शरद कोरगांवकर ,रोहित शेंडे ,शिवा देवर ,व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments