शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ यांच्यातर्फे आयोजित 'उपक्रमशील शिक्षक सन्मानाने' नुकतेच प्राथमिक शिक्षक म्हणून आपली सेवा बजावणाऱ्या श्री युवराज खडके यांना सन्मानित करण्यात आले.
शाहूवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ तर्फे हा पुरस्कार तालुक्यातील उपक्रमशील व विद्यार्थी प्रिय शिक्षकांना प्रदान केला जातो. यंदाचा हा पुरस्कार श्री युवराज खडके या प्राथमिक शिक्षकांस प्रदान करण्यात आला.
श्री युवराज खडके हे सध्या सावे येथील शाळेमध्ये कार्यरत आहेत. आपल्या ३० वर्षांच्या सेवेमध्ये त्यांनी रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागात आपली सेवा बजावली आहे. ही सेवा बजावत असताना त्यांनी त्या त्या ठिकाणच्या शाळांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
स्वतःमधील चौफेर व्यक्तिमत्वाचा वापर करून शाळांचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. यापूर्वी देखील त्यांना त्यांच्या कार्यासाठी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
0 Comments