वैराग/प्रतिनिधी;
बार्शी तालुक्यात मागील काही दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे.काल झालेल्या जोरदार पावसामुळे मालेगाव- वैराग रस्ता खचला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अत्यंत धोकेदायक बनली आहे.
काटेरी झुडपे टाकून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असली तरी अत्यावश्यक काम असल्यास तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी मालेगाव मधील नागरिक आपला जीव मुठीत धरून व तारेवरची कसरत करीत या खचलेल्या रस्त्यावरून मार्गक्रमण करत आहे. अशा परिस्थितीमुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पावसामुळे वैराग - मालेगाव(आर) रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हाच रस्ता पुढे उस्मानाबाद जिल्ह्यास जातो.
0 Comments