उजनी धारणातून ३० हजार क्युसेकचा विसर्ग : पंढरपूर तालुक्यातील पुरसदृश्य परिस्थिती


पंढरपूर 

उजनी धरण १११.०५ टक्के भरले असून बुधवारी सकाळपर्यंत धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पातून ३० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. याचबरोबर वीज निर्मितीसाठी १६०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे.वीर धरणातून ८०० क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. भीमा नदी मंगळवारी १५ सप्टेंबरला संगम येथे  २३ हजार तर पंढरपूरजवळ १३ हजार क्युसेकने वाहात होती.

 भीम नदीच्या परिसरातील गावाना पुराचा धोका निर्माण झाला आहे. बुधवारी रात्री पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या तालुक्यात मुसळधार पावासाची नोंद झाली आहे. या पावासामुळे पंढरपूर तालुक्यातील आंबे, चाले, वाखरी, सरकाली चंद्रभागा नदीच्या काटच्या गावाचा संपर्क तुटला आहे. तर शेतकऱ्यांच्या शेताचे मोठे नुकसान झाले आहे. भीम नदीचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचे शेवटचे १५ दिवस शिल्लक असताना जिल्ह्यात सरासरी पावसाच्या ११६ टक्के म्हणजेच ४५५ मिमी पाऊस झाला आहे. उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर वगळता इतर तालुक्यात १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.बार्शी तालुक्यात सर्वाधिक ५८८ मि.मी. पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत १२७.२० टक्के पावसाची नोंद कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.


उत्तर सोलापूर ३८०.५० (८२.२० टक्के), दक्षिण सोलापूर ३५३.६० (७९.४० टक्के), बार्शी ५५८.१० (१२६.३० टक्के), अक्कलकोट ४७०.३० (१०३ टक्के), मोहोळ ४४३ (११९.८० टक्के), माढा ४७५.७०(१२२.५० टक्के), करमाळा ४२४.३० (११४.३० टक्के), पंढरपूर ४५६.९० (११५.७० टक्के), सांगोला ४३१.७०(११६.९० टक्के) माळशिरस ४९१.१० (१४१ टक्के), मंगळवेढा ४५६.५० (१३३ टक्के) पाऊस झाला अाहे.

Post a Comment

0 Comments