हॉस्पिटल मॅनेजमेंट -१,५०,०००बिल भरावे लागेल.
रुग्णाचे नातेवाईक- विनायक साळोखेना बोलवून घेतले आहे ते आल्यावर भरतो...
हॉस्पिटल मॅनेजमेंट - बर मग १,१०,०००/- भरा
हा किस्सा आहे कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटल मधला. काही दिवस झाले कोल्हापुरात कोरोना रुग्ण साठी बेडस उपलब्ध नाहीत. लोक उपचार अभावी मरत आहेत. येथील मृत्युदर हि वाढत आहे. प्रशासनावरील ताण असेल, लोकांचा हलगर्जीपणा असेल किंवा खाजगी हॉस्पिटल ची फसवुनिकाचा धंदा असेल. अशी अनेक कारणे आहेत जी कोरोना रुग्ण उपचाराअभावी मरत आहेत.
प्रशासनाला आणि येथील परिस्थीला शिव्या देत बसण्यापेक्षा आपण काहीतरी या रुग्णाच्या उपचारासाठी मदत करू शकतो हा विश्वास मनात ठेऊन विनायक साळोखे घरा बाहेर पडला.
****************************************
पत्ता-: पहिला मजला शाहूपुरी तिसरी गल्ली पत्की हॉस्पिटल च्या समोर कोल्हापूर
(Advertise)
****************************************
बरेच रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडत आहे. हे लक्षात आले नंतर याने शहरातील हॉस्पिटल आणि प्रशासनाशी संपर्कात राहून कोणत्या ठिकाणी किती बेड उपलब्ध आहे. आधीच पेशन्ट ऍडमिट असलेले बेड कधी रिकामी होतील यांची माहिती घेत राहिला आणि आपला मोबाईल नम्बर सोशल मीडिया वर सार्वजनिक केला. ज्यांना व्हेंटिलेटर बेड हवा असेल त्या रुग्णाचे नातेवाईक याच्याशी सम्पर्क करू लागले. विनायक ला फोन आल्यानंतर तो रुग्ण हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होईपर्यंत त्यांचा संपर्कात असतो. जिथे बेड उपलब्ध आहेत त्यांची रोज माहिती तो गरजवंतांना पुरवत असतो. फक्त शहरापुरते मर्यादित न राहता जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील हि लोकांना मदत करतोय.
एवढ्यावरच न थांबता. काही खाजगी हॉस्पिटल रुग्णाची बिले अवाच्या सव्वा केल्यांनतर त्यांना जाब विचारून योग्य बिल आकारणी करायला हि लावतो. आतापर्यंत याने कमीत कमी ६० रुग्णांना मदत केली आहे आणि हे कार्य खंड न पडू देता सुरुही आहे.
हे सर्व एकटा करत आहे. परंतु आता रुग्णसंख्या आणि ह्याला येणारे कॉल्स वाढत असल्याने हे कार्य एकट्याने करणे थोडे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यानं असे आवाहन केलं आहे कि ज्यांना अशी मदत करायची इच्छा आहे त्यांनी त्याला जॉईन करू शकता.
एक युवक घरात बसून न राहता आपल्या जनसंपर्काचा योग्य तो वापर करून लोकांचे जीव वाचवण्यासाठी मदत करतो हि खरच कौतुकास्पद बाब आहे.
विनायक साळोखे, मोबाईल: +91 9850585058
शब्दांकन- निर्भय उलस्वार
0 Comments