बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक जसजशी जवळ येऊ लगली आहे. तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. विरोधक एकमेकांवर निशाना साधण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.
आज राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पहिल्या डिजिटल रॅलीतून (निश्चय संकल्प रॅली) बिहारच्या जनतेशी संवाद साधत, विरोधकांवरही हल्ला चढवला.
यावेळी नितीश यांनी कोरोना टेस्टपासून ते वीजेच्या प्रश्नापर्यंत आपल्या सरकारने केलेल्या अनेक कामांचा पाढा वाचला.
बिहारमध्ये आता घरा-घरात वीज पोहोचली आहे. यामुळे कंदील वपरण्याचे दिवस आता संपले आहेत. आज राज्यात रोजच्या रोज दीड लाखहून अधिक लोकांची कोरोना तपासणी होत आहे. एवढेच नाही, तर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधिति व्यक्तीच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णयही सरकारने घेतला असल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.
0 Comments