मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी....



कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगत मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देणारे फोन आल्याने खळबळ उडाली आहे. मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. हे फोन दुबईतून आले आहेत. धमकी देणाऱ्याकडून दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचा दावा केला आहे. 

कोरोना संसर्गामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पोलिस सुरक्षा कमी केली होती. मात्र आता दुबईहून आलेल्या धमकीच्या फोन कॉल नंतर ठाकरे कुटुंबाची  सुरक्षा पुन्हा वाढवण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments