आठ दिवसांत मंदिरे खुली करण्याचे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन : प्रकाश आंबेडकर



पंढरपूर /प्रतिनिधी;   मॉल, बाजारपेठा  सगळं चालू आहे सगळं काही चालू असताना  फक्त धार्मिक स्थळावर बंदी का? असा प्रश्न विचारतात प्रकाश आंबेडकर यांनी  पंढरपुरात  आंदोलनाला सुरुवात केली, लवकरात लवकर लोकांसाठी मंदिर, मशीद, बुध्दविहार, जैन मंदिर सुरु केली जातील. त्यासाठी सरकार नियमावली तयार केली जात आहे, अशी माहिती मला मुख्यमंत्र्यांकडून मिळाली. आठ ते दहा दिवसात ही नियमावली तयार होईल आणि मंदिरं सुरु होतील, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. 

मंदिरं खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन अखेर संपलं. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी दर्शन घेतलं. १५ जणांच्या शिष्टमंडळाला दर्शन देण्यात आलं. मंंदिरं खुली करण्याबाबत  मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आपण आठ दिवस थांबू, वारकऱ्यांच्या आंदोलनाला यश आलं असं आपण समजुया, असं आंबेडकर म्हणाले.

Post a Comment

0 Comments