कठीण काळात मदतीसाठी सरसावली युवा शक्ती कृषी पदवीधर संघटना


एका युवकाचे वाचवले प्राण

गेल्या पंधरा दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत सोलापूर येथील इनामदार हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असणाऱ्या कृषी पदवीधर गणेश जाधव यांच्या मदतीला कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना मैदानात उतरली,  शेतात काम करत असताना सर्प दंश झाल्याने गणेश जाधव हा कृषी पदवीधर मृत्यूच्या दाढेत  गेला त्यांच्यावर उपचार चालू झाले परंतु त्यांचे कुटुंब  आर्थिक  परिस्थितीत बिकट असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर संकटाचा डोंगर कोसळला, अशा वाईट काळात युवाशक्ती परिवाराने त्यांना हतबल होऊ दिले नाही.

याप्रसंगी करमाळ्याचे तालुकाध्यक्ष रोहित माने व इंदापूरचे तालुका अध्यक्ष वैभव पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत कृषी पदवीधर गणेश जाधव यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोहीम उघडली याला राज्यभरातील कृषी पदवीधरांनी समर्थन देत अवघ्या दोन दिवसात लाख रुपयांची मदत जमवली.

जमा केलेली रक्कमेचा हा संपूर्ण धनादेश आज कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष जयदीप दादा ननवरे कार्याध्यक्ष प्रवीण भैय्या आजबे यांच्या उपस्थितीत गणेश जाधव यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला,तसेच गणेश जाधव यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून विचारपूस करण्यात आली व त्यांच्या कुटुंबियांना मानसिक धीर देण्यात आला व महाराष्ट्रातील संपूर्ण अग्रिकॉस परिवार कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या मार्फत गणेश जाधव यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे याची जाणीव यावेळी करून देण्यात आली ,तसेच रोहित माने वैभव पाटील या युवाशक्ती परिवाराच्या शिलेदारांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे 

 लवकरच सर्वांच्या आशिर्वादाने आपला कृषी मित्र गणेश जाधव हा बरे होतील व पुन्हा त्याच जोमाने त्यात जोशाने आणि नव्या उमेदीने काळ्याआईच्या सेवेत पुन्हा रुजू होतील, आजच्या या प्रसंगी संघटनेचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष जयदीप दादा ननावरे  कार्याध्यक्ष प्रवीण भैय्या आजबे इंदापूर तालुका अध्यक्ष रोहित पाटील करमाळा तालुका अध्यक्ष रोहित माने माढा तालुका अध्यक्ष शुभम लोकरे पाटील युवाशक्ती परिवारातील आदित्य पाटणकर रणजीत कदम ,गिरीश बनकर व किरण जाधव हे उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments