पंढरपूर/प्रतिनिधी;
मंगळवेढ्यातील भाळवणी गावात मुलाने प्रेम संबंधनातून मुलीला पळून घेऊन गेल्यानंतर मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण केल्याची घडली आहे. या घटनेमुळे मंगळवेढा एकच खळबळ उडाली आहे.
भाळवणी गावात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेमसंबंधातून मुलीला पळवून नेऊन लग्न केले होते. या माहिती मिळताचा मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर हल्ला केला. या घटनेने संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना घरापासून तीन कि.मी अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकातील लिंबाच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली. गावाच्या चौकात या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. गावकऱ्यांची एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे गावातील लोकांनी वेळीच हस्तक्षेप करून मुलाच्या वडिलांची सुटका केली.
गावातील लोकांनी या घटनेबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणाऱ्या नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस करत आहे.
0 Comments