ज्योती क्रांती परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप कांबळे


कोल्हापूर/प्रतिनिधी ;

ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेश या संघटनेने आता आपले काम व विचार सर्वत्र पोहचवायला मोठ्या वेगाने सुरुवात केली आहे.मागील काही दिवसामध्ये अहमदनगर जिल्हयाच्या जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती झाल्या नंतर आज कोल्हापूर जिल्हयाच्या जिल्हाअध्यक्ष पदाची निवड करण्यात आली असल्याची माहिती ज्योती क्रांती परिषद चे प्रदेशाध्यक्ष  रमेश बारसकर यांनी दिली.

ज्योती क्रांती परिषदेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी शाहू,फुले,आंबेडकर चळवळीचे तरूण कार्यकर्ते संदिप जी कांबळे यांची निवड करण्यात आली आहे आज संघटन वाढीच्या दुष्टीने कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना ज्योती क्रांती परिषद चे प्रदेशाध्यक्ष व मोहोळ चे प्रथम  नगराध्यक्ष रमेश बारसकर  यांच्या शुभहस्ते संदिप कांबळे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

 समाजातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी ज्योती क्रांती परिषद माध्यमातून समाज हित जोपासावे असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष श्री.रमेश बारसकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

या वेळी ज्योती क्रांती परिषदेचे मार्गदर्शक प्रा. प्रकाश सोनवणे,मोहोळ ग्रामपंचायतचे माजी सदस्य जितेंद्र अष्टूळ,रवि(काका)थोरात यांच्या सह कोल्हापूरातील चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते.

संघटनेने दिलेली महत्वपुर्ण जबाबदारी मोठ्या कष्टांने व प्रामाणिक पणे पार पाडू शिवाय संघटनेचा विचार संपुर्ण कोल्हापूर जिल्हयामध्ये पोहचविण्यासाठी अविरतपणे काम करेन असा विश्वास नूतन जिल्हाध्यक्ष संदिप कांबळे यांनी दिला.

Post a Comment

0 Comments