जुनेद शेख यांची पैलवान ग्रुप बार्शी तालुका अध्यक्षपदी निवड


बार्शी : कुस्तीच्या प्रचार व वृद्धीसाठी तसेच कुस्तीपट्टूंना बळ देण्यासाठी स्थापन झालेल्या पैलवान ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी सुर्डी गावचे मल्ल जुनेद शेख यांची निवड झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विलास देशमुख यांनी या निवडीचे पत्र दिले. 

पै.जुनेद शेख उत्कृष्ट कुस्तीपट्टू असुन अनेक कुस्ती मैदाने,शालेय, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी विजेते पद मिळवले आहे. तसेच मानाची 'मळेगाव केसरी'ची गदा त्यांनी पटकावली आहे. सुप्रसिद्ध मल्ल कुस्ती सम्राट आस्लम काझी यांचे ते भाचे आहेत. 

कुस्तीच्या वाढ, विकासाठी व प्रचारासाठी ही संघटना काम करत आहे. पै.जुनेद शेख यांच्या निवडीबद्दल तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments