सीपीआरमधील प्रत्येक वॉर्डमध्ये सीसीटीव्हीकोरोना रुग्णांसाठी बेडबाबतची माहिती होणार उपलब्ध ; जिल्हाधिकारी दौलत देसाई



कोल्हापूर, दि. १९:  येथील सीपीआरमधील प्रत्येक वॉर्डात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यामाध्यमातून कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध बेड आणि रुग्णांवरील उपचाराबाबत माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.   
  
कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी सीपीआरमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची उपाययोजना करण्यात आली आहे. प्रत्येक वॉर्डमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले असून याची पाहणी पालकमंत्री महोदय, अधिष्ठाता, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रुम याठिकाणी करता येणार आहे. या सीसीटीव्हीमुळे कुठल्या ठिकाणी किती बेड उपलब्ध आहेत हे समजणार आहे. या रुग्णांची तपासणी त्यांच्यावर वैद्यकीय उपचार होतात की नाही हेही समजणार आहे. सीपीआरमधील तज्ञ डॉक्टरांना देण्यात आलेल्या सेवेनुसार ते रुग्णांना तपासत आहेत का हेही समजणार आहे. सीसीटीव्हीमुळे रुग्णांना चांगली सुविधा मिळणार आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
 

Post a Comment

1 Comments

  1. साहेब नमस्कार, ही केलेली व्यवस्था अत्यंत चांगली आहे, व आनंददायी बाब आहे.पण सीपीआरमध्ये दि.17ऑगष्ट2020 रोजी शंकर रंगराव यादव आमचे बंधु यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. व्हेंटिलेटर मिळाला नाही म्हणून आणि यातली कोणतीही पेशंट बाबतची हालचाल दिसून आली नाही. आमचा भाऊ सकाळी साडे आठच्या दरम्यान आमच्याबरोबर व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून व्यवस्थित रित्या बोलत होता आणि सीपीआर प्रशासनाने दहा वाजता मृत घोषित केलं कृपया करून याची चौकशी करावी ही नम्र विनंती.

    ReplyDelete