सोलापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणारे उजनी धरण आज शंभर टक्के भरले.जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असणारे उजनी धरण १०० टक्के भरते तेव्हा हा पाणीसाठा आणि त्यामुळे होणाऱ्या निश्चिततेचा आनंद वर्षभर पुरेल असा असतो.
पुणे परिसरात झालेल्या पाऊसामुळे उजनी धरणात झपाट्याने वाढ झाली आहे. इतर धरणं भरल्यानंतर त्या धरणातील सोडलेले पाणी उजनी धरणात येत आहे. त्यामुळे आज अखेर उजनी धरणात ११७ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सध्या दौंड वरून २३ हजार क्यूसेक विसर्गाने पाणी येत आहे.
उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल असल्याने उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, तसेच नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असा ईशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
0 Comments