अपघातात दोन्ही हात गमावले, पण 'अर्जुन'सह अनेक पुरस्कार कमावले

माळशिरसकर सुयशच्या जिद्दीला सलाम 

वयाच्या ११व्या वर्षी अपघातात दोन्ही अर्धे हात गमवावे लागल्याने परिस्थितीमुळे व्य॔गत्व आलेल्या सुयश नारायण जाधव या जिद्दी तरुणाने पुर्ण हात नाहीत म्हणुन न खचता आत्मविश्वासाच्या बळावर व्यंगत्वावर मात करीत जलतरण क्रिडा प्रकारात चिकाटीने प्रचंड मेहनत करुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण क्रिडा स्पर्धेत असामान्य कामगिरी केेेली. अशी कामगिरी करणारा तरुण माळशिरस तालुक्यातील वेळापूर येतील आहे.
ह्या जिद्दी सुयश जाधवला भारत सरकारचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आणि सोलापूरच्या इतिहासात पहिल्या अर्जुन पुरस्काराची नोंद झाली ती सुयशच्या रूपाने. पण गावात नाही तर तालुक्यातही अजून कोणाला याबाबत माहितीच नाही. 

लहानपणापासुनच सुयश जाधव यांना जलतरणाची मोठी आवड होती. वयाच्या ११ व्या वर्षी विजेचा झटका बसून सुशांतचे दोन्ही हात कापावे लागले. परिस्थितीने व्यंगत्व आल्यानंतरही निराश न होता सुयश याने जिद्दीच्या जोरावर अफाट परीश्रम करीत जलतरण क्रिडा प्रकारात नैपुण्य मिळवले. जलतरण क्रिडा प्रकारात भाग घेण्यास सुरवात केली. सुयशचे मनोबल भक्कम असल्याने जिल्हा, राज्यस्तरावर यशाची पायाभरणीही भक्कम झाली.राज्यस्तरावर ५० सुवर्ण पदक मिळविल्यानंतर सुयशने राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेतुन ३७ सुवर्ण,६ रौप्य व ३ कास्यपदके मिळवली तर आंतर राष्ट्रीयस्तरावर ५ सुवर्ण,९ रौप्य,७ कास्यपदके कमवली. सुयशने आशियायी पॅरागेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली असुन वर्ल्ड जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धेत दोन वेळा सहभाग घेतला आहे.त्यांनी आतापर्यंत १९८ टक्के मिळविली असुन २०२० टोकीओ येथील पॅराऑलेम्पिक जलतरण स्पर्धेसाठी सुयश जाधव पात्र ठरले आहेत.तर २०१६ साली राज्यशासनाच्यावतीने आंतरराष्ट्रीय स्तरा- वरील कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते ५० लाख रु व एकलव्य पुरस्कार देेेेवुुुन सुयश जाधव यांना सन्मानित कले. तसेेच केंद्र शासनााने २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती प्रणव मुुखर्जी याच्या हस्ते ५० लाख रु देेेवुन सन्मान केला आहे.

सुयश जाधव याचे वडील नारायण जाधव हे उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून नावाजलेले. त्यांनी राज्यात व देशात अनेक पुरस्कार मिळविले. मात्र परिस्थितीमुळे त्यांना यात करिअर करता आले नाही आणि ते वेळापूर येथील एका शाळेत क्रीडा शिक्षक म्हणून सेवेत दाखल झाले. सध्या कोरोनामुळे पुणे येथे क्रीडाधिकारी पदावर कार्यरत असणारा सुयश आपल्या शेतातील झोपडीत कुटुंबासमवेत राहतोय. 

Post a Comment

0 Comments