'उचकी' राजकीय उलथापालथीवर केलेलं भाष्य....!!


✒️ प्रा.प्रशांत वीर-पाटील                            

उचकी तशी शारीरिक अतःक्रीयेतील अडथळ्यांची प्रतिक्रीया, परंतु उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतलेली आढावा बैठक, त्यांचा दौरा कुठेतरी राजकीय उचकी चा प्रकार दर्शवतो. जरी राज्यात काँग्रेस मिञ पक्षाच्या सहाय्याने सत्तेवर विराजमान असला तरी राज्याच्या बर्याच भागामध्ये पक्ष खिळखिळा होतो आहे, राष्ट्रीय पातळीवर पायलट, सिंधीया चे बंड जिव्हारी लागल असेलच, उस्मानाबाद जिल्हयाच्या राजकारणात उमरगा तालुका आणी काही प्रमाणात लातुरात नजर ठेवून असलेले बसवराज पाटील, तुळजापूर चे मधुकरराव चव्हाण आपापल्या गढ्या मजबुत ठेवण्यात मग्न असतात, त्यामुळे जिल्ह्य़ातील इतर भागात पक्ष संघटन, विस्तार ही जबाबदारी म्हणून प्रयत्न करणे आवश्यक वाटले नसेल.

 तत्वतः सर्वस्वी जबाबदार यांनाच धरण अयोग्य होइल  कदाचीत, जस राज्याच तस  जिल्हयाच होण्यास वेळ लागणार नाही. जिल्ह्य़ातील सेना व राष्ट्रवादी चे पूर्वापार प्राबल्य अशात राणा पाटलांच्या भाजपा प्रवेशमुळे काँग्रेसला जिल्हयात अवकळा आली आहे, सेनेचा तरूण, तळागळात पोहोचणारा खासदार ओमप्रकाश निंबाळकर आणी त्यांचे सहकारी आमदार जिल्हा पिंजून काढत आहेत, हे स्वमजबुतीकरण, आणि पक्ष मजबुतीकरणात भर घालणारे दिसुन येते. 

भुम-परांडा-वाशी आणी इतर भागातील जुन्या सहकारी मंडळींनी काँग्रेसचा जु कधीच झुगारून दिला, पक्षाला आलेली मरगळ विचारात घेऊनच थोरातांचे उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठकीतील सुचक विधान काँग्रेस च्या नेत्यांना उचकी आणणारे होते. पक्षीय मरगळी बाबत आत्मपरीक्षण, पुनःसंघटन, पुनर्बांधणी करण्याची गरज ओळखून सक्रीय राहण्याची आशा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी ठेवली असावी. स्वप्रतीष्ठेचे वलय, विलग(अंतर) ठेवुन राहणारी वृत्ती जोपासना अशा अनेक बाबी विचारात घेवुन वाटचाल करणे तितकेच गरजेचे असाव.

Post a Comment

0 Comments