कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय.पाटील पॉलीटेक्निकला 'व्हेरी गुड ' श्रेणी मिळाली आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी केलेल्या शैक्षणिक आवेक्षणानंतर ही श्रेणी जाहीर करण्यात आली आहे.यामुळे या पॉलीटेक्निकची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई च्या तज्ज्ञ समितीने मार्च महिन्यात पॉलीटेक्निकला भेट देऊन तपासणी केली होती.यामध्ये पॉलीटेक्निकच्या विविध विभागांच्या कामाची सविस्तर माहिती घेतली होती. तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाज, तज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगांशी समन्वय आदी बाबींचा आढावा घेतला होता.त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा क्रीडा , सामाजिक , सांस्कृतिक, प्रकल्प सादरीकरण , त्याचबरोबर विविध कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या झालेल्या निवडीची तपशीलवार माहिती घेतली होती. या सर्व क्षेत्रात पॉलीटेक्निकने अत्यंत चांगली कामगिरी केली होती.त्यामुळे व्हेरी गुड ही श्रेणी प्राप्त झाली आहे.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील,उपाध्यक्ष ना.सतेज पाटील, विश्वस्त आ.ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए.के .गुप्ता यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले.
यासाठी प्राचार्य डॉ.महादेव नरके, उपप्राचार्य प्रा.एम.पी.पाटील,अकॅडेमिक मोनिटरिंग प्रमुख प्रा.नितीन माळी, प्रथम वर्ष विभाप्रमुख प्रा.बी.जी.शिंदे , मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा.महेश रेणके, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.अक्षय करपे ,सहायक प्रबंधक अनिल देशींगे,
यांच्यासह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments