मंगळवेढ्यातील विवाहित महिलेचे अपहरण करून लग्न लावले; चौघांवर गुन्हा


मंगळवेढा/प्रतिनिधी;

 मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद येथील ३० वर्षीय महिलेस बळजबरीने जीपमध्ये घालून पळवून नेऊन लग्न झाल्याचे भासवले. २१ ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. 

याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मांजरगाव येथील कपिल देशमुख,अजित देशमुख,सतीश व इतर एक अनोळखी इसम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विवाहित महिलेस तिच्या ओळखीच्या लोकांनी तिला जबरदस्तीने जीपमध्ये बसवून गळ्यात हार घालायला लावून लग्न झाले आहे,असे भासवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पिडित महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तिचे पती हे घरासमोरील अंगणात झोपले होते. पीडित महिलेच्या ओळखीच्या कपिल देशमुखसह संशयित हे पांढऱ्या रंगाची जीप घेऊन तेथे आले. तिला बळजबरीने हाताला धरून जीपमध्ये घातले. कपिल देशमुख याने तूच माझी बायको आहे, मी तुला सोडणार नाही, तू कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या घरातील लोकांना माझ्या गाडीत असलेल्या तलवारी, कु-हाडीने मारून टाकू,अशी धमकी दिली. 

पोलिसांनी संशयितांवर अपहरण व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सहायक फौजदार संजय राऊत तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments