भारत हा विविध कलागुणांनी आणि जाती धर्मांनी नटलेला देश आहे. इथे अनेक जाती-धाराचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. याची अनेक उदाहरणे आपण वर्तमान पात्रात वाचली सुद्धा असतील तसेच आपल्या आजूबाजूला नजरेस सुद्धा पडले असतील.
त्याच प्रकारचं उदाहरण अहमदनगर जिल्हात घडले, या टोपीवाल्या, दाढीवाल्या मुसलमान माणसाला बिलगून या नव वधुच्या रुपातील दोन हिंदु तरुणी का बरं रडत आहेत ? त्याच कारण असं की अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव येथील भुसारे परिवारातील या दोन मुलींच्या लग्नात मामा म्हणुन बाबाभाई पठाण यांनी कन्यादान केलं. त्याचा फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.
या मुलींची आई दरवर्षी बाबाभाईंना राखी बांधते कारण त्यांना सख्खा भाऊ नाही. बाबाभाईंनी कन्यादान करत एका मामाच अन् भावाचं कर्तव्य पार पाडलं. अनेक वर्षांपासून लाडवलेल्या या भाच्या सासरी निघताना त्यांचा ऊर भरुन आला अन् त्या नववधू ही बाबा मामाला बिलगून रडू लागल्या.
जात, धर्म, पंथ काही नसतंय ओ तुमच्या माझ्या मनात माया,प्रेम, माणुसकी असली ना की झालं. कुठला धर्म अन् कुठलं काय. माणुसकीचा झरा असणारी माणसं काहीही करू शकतात.
0 Comments