नवी दिल्ली: राजधानी दिल्ली येथे आज सकाळी संसद भवनच्या ॲनेक्स इमारतीला भीषण आग लागली असल्याची माहिती समोर आली. इमारतीच्या सहाव्या मजल्याला ही आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनची ५ पथक घटनास्थळी दाखल झाली.
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, ही आग अटोक्यात आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंबंधी अधिक तपास सुरू आहे.
0 Comments