तिटवे/प्रतिनिधी:
शहीद शिक्षण प्रसारक मंडळ तिटवे संचलित शहीद पब्लीक स्कूल आणि शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयामध्ये ७४ वा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करत हा दिवस साजरा करण्यात आला. गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर चमकविन्याचे ध्येय बाळगणारी आपली संस्था आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपण सर्व प्रयत्नशील राहू अशा प्रकारचे मत डॉ. जगन्नाथ पाटील यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे मार्गदर्शक आणि सध्या जपान सरकारचे विशेष शैक्षणिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. जगन्नाथ पाटील यावेळी उपस्थित होते. माजी सैनिक मा. एकनाथ घारे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. तिटवे गावाचे पोलीस पाटील वसंत पाटील प्रमुख उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रशांत पालकर, पब्लिक स्कूलचे प्राचार्य अनिल भांडवले, संस्थेचे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संस्थेचे शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, तिटवे गावचे ग्रा. प. सदस्य, ग्रामस्थ, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला शेटगे यांनी केले.
0 Comments