'पापड खा आणि कोरोनाला पळवा'..! असे म्हणणारे केंद्रीय मंत्री पॉझिटिव्ह


नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यावर औषध किंवा लस येण्यावर रोज वेगवेगळे दावे आपण ऐकत असतो. अशात अमुक खाल्ल्याने कोरोना बरा होतो, म्हणणारे दावेही आपण ऐकले.

केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी असे विधान केले,'पापड खाल्ल्याने कोरोना, व्हायरस ठीक होईल' असा दावा त्यांनी केला होता, नंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याच मंत्री मेघवाल यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Post a Comment

0 Comments