बार्शी ; सामान्य कुटुंबाला स्वतःच्या घरात राहण्यासाठी किमती कमी करून, बांधकाम तसेच रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, शासन नवीन धोरनाची अंमलबजावणी करत असून 'बारामती पॅटर्न' राज्यातील या नगरपालिका महानगरपालिका येथे राबवला जाईल, असे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाचे सहा अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
हा पॅटर्न बार्शी शहरात राबवून सुमारे पाच हजार घरे निर्माण करण्यात येतील पण यासाठी पालिकेचे सहकार्य महत्त्वाचे आहे. लॉकडाऊन अंतर राज्याच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने निर्माण झाले आहेत. सर्व क्षेत्रात दुष्परिणाम दिसून येत असताना रोजगार निर्मितीचा प्रश्न भेडसावत आहे, यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुंबई येथे बैठक संपन्न झाली, या बैठकीमध्ये बारामती पॅटर्न प्रमाणे प्रत्येक सामान्य नागरिकांना स्वतःचे घर मिळण्यासाठी बार्शी मध्ये या योजनेची अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments