पंढरपूर/ प्रतिनिधी;
राज्यातील शेतकरी कोरोना संकटाच्या काळात अडचणीत आहे . त्यात दूध उत्पादक शेतकरी खूप अडचणीत आहे दुधाचे दर सध्या खूपच खालावलेले आहेत. दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर देऊन लूट करीत असल्याची टीका आ राम सातपुते यांनी केली.
माळशिरस तहसील कार्यालय येथे महायुतीच्या वतीने निष्क्रिय राज्य शासनाचा जाहीर निषेध करीत धरणे आंदोलन केले. या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या दुधाला प्रति लिटर दर दुधाला दहा रुपये प्रति लिटर अनुदान दूध भुकटीला निर्यातीसाठी पन्नास रुपये प्रति किलो अनुदान अशा प्रमुख मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्ह्याचे नेते धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस तालुका अध्यक्ष सोपानराव नारनवर ,माजी पंचायत समिती सदस्य के के पाटील यांनी उपस्थित होते.
माळशिरस तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार तुषार देशमुख यांना माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती शोभाताई साठे व भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष सोपानकाका नारनवर यांनी सर्व उपस्थित आंदोलकांच्या समोर निवेदन दिले.
0 Comments