सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
शारदाताई गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. मुंबईतील नामवंत अशा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. राज्यावर कोरोनाचे संकट ओढवल्यापासून ते आजअखेर आरोग्य मंत्री हे संपूर्ण राज्याची व आपल्या आईच्या तब्येतीची जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने निभावत होते. मात्र गेल्या काही दिवसात टोपे यांच्या आईची तब्येत खालवत होती. आज सायंकाळपासूनच त्यांची तब्येत खालावली होती. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पार्थपुर या जालना जिल्ह्यातील त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर उद्या दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

Post a Comment

0 Comments