पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या भाचरवाडी या गावातील अतिवृष्टीमुळे खचला रस्ता...


कोतोली/प्रतिनिधी;

आठवडाभरापासून सुरू असणाऱ्या जोरदार अतिवृष्टीमुळे भाचरवाडी ते  कोतोली दरम्यान असणाऱ्या रस्त्याला एका ठिकाणी साधारणपणे चौदा फूट लांब आणि एक फूट खोल चर पडून डांबरीकरण पूर्णपणे खचले आहे तर दुसऱ्या ठिकाणी शंभर मीटर लांब व अडीच फूट खोल रस्ता पाण्याच्या अति प्रवाहाने  तुटून गेला आहे . 

सुरक्षिततेखातर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे .हा मार्ग बंद झाल्याने  या परिसरातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पन्हाळा पश्चिम परिसरातील लोक या मार्गावरूनच पन्हाळ्याकडे कामानिमित्त ये जा करतात, परंतु सध्या हा मार्ग खचल्याने येणे-जाणे ठप्प झाले आहे .तसेच या  रस्त्यावर  ठीक-ठिकाणी खड्डे पडले असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून वाहतूक करावी लागते.
       
मसाई पठाराशेजारील अनेक ठिकाणचा भूभाग गेल्या तीन-चार वर्षांपासून खचत आहे.या घटना वारंवार घडत असल्याने पन्हाळा परिसराच्या आसपासचा परिसर धोक्यात आहे. या विषयाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments