✒️ राकेश करमळकर
आजरा तालुक्यात गवसे येथे हाकेच्या अंतरावर कोविड तपासणी नाका आहे, गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांची याठिकाणी तपासणी केली जाते. याच नाक्यावरती कॉन्स्टेबल सचिन वायदंडे ड्युटीवर होते. त्यांची नजर त्या ठिकाणी असणाऱ्या एका माणसावर गेली, त्या माणसाच्या कुशीत साधारण पाच ते सहा वर्षाचे एक बाळ होते या बाळाला तो इसम काहीतरी भरवत होता.
पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे तेथे हजर असणाऱ्या कॉन्स्टेबल सचिन वायदंडे यांनी त्या इसमास हटकले, तर त्यांनी बयान केलेली माहिती अशी की सदरचा इसम हा सोलापूर येथील असून तो सध्या गोवा येथे कामानिमित्त राहात होता. याची पत्नी त्याला व त्याच्या तान्ह्या मुलाला टाकून कुठेतरी पळून गेली. त्यामुळे तो इसम त्या मुलाला घेऊन भर पावसातून भुकेने व्याकुळ असतानादेखील गोव्याहून चालत सोलापूरला चालला होता लहान जीव भुकेने व्याकुळ झाल्यामुळे रडत होते.
कॉन्स्टेबल सचिन वायदंडे यांना हा प्रसंग पाहावला नाही त्यांनीही सर्व हकीकत ऐकताच आपल्याकडील जेवणा चा डब्बा या इसमास दिला, त्या इसमाने व त्याच्या तान्ह्या मुलगा खंडेराया यांनी पोटभर जेवण केले त्यानंतर मात्र निरागस खंडेरायाच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद वाहू लागला. कॉन्स्टेबल सचिन वायदंडे यांनी स्वतः उपाशी राहून त्या दोघांना केलेली अन्नाची ही मदत म्हणजे 'खाकीवर्दीतील चांगुलपणाचे' दर्शनच म्हणावे लागेल.
0 Comments