राज्यातील धार्मिक स्थळे उघडी करा ; आमदार रोहित पवार


देशभरातील कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील धार्मिक स्थळे बंद आहेत ती मंदिरे उघडी करा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संपुर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.दरम्यान धार्मिक स्थळांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने, धार्मिक स्थळे सुद्धा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

 त्यामुळे उद्योगधंदे, दुकाने खुली करण्यास सरकारकडून परवानगी मिळाली होती. मात्र धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. दरम्यान, रोहित पवार यांना आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे की, ''मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील.'' असे रोहित पवार यांनी स्पस्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments