मुंबई : बॉलिवूड माफिया पेक्षा जास्त मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असा खळबळजनक आरोप सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने ट्विटरवरून केला आहे. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकार किंवा थेट केंद्राकडून सुरक्षा द्या. पण मुंबई पोलिसांकडून नको, असे तिने या ट्विटमध्ये म्हटले आहे. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर कंगनाने बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांचे कनेक्शन उघड करण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी तिला पोलीस सुरक्षा हवी आहे. शंभर तास, चार दिवस उलटून गेले तरी कंगनाला सुरक्षा मिळत नाही, असे ट्वीट भाजप आमदार राम कदम यांनी केले. या ट्वीटला कंगनाने रिट्वीट करत मुंबई पोलिसांवरील आपला अविश्वास दाखवून दिला.
नार्कोटीक्स टेस्ट झाल्यास अनेक कलाकार जेलमध्ये जातील असा खळबळजनक दावाही कंगनाने केला आहे.
0 Comments