दोन कोटी नोकर्‍या गेल्या तरी चर्चा सुशांतवर..


माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांची प्रसार माध्यमांवर खरमरीत टिका

नवी दिल्लीः  माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू म्हणाले, कोरोना महामारीत दोन कोटी  लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत आणि केवळ सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात माध्यमांत चर्चा करत आहोत.म्हणजे नोकर्‍या महत्वाच्या नाहीत तर सुशांत सिंगची आत्महत्या महत्वाची वाटते, केंद्रसरकार व प्रसार माध्यमे यांच्यावर खरमरीत टिका केली आहे.
काटजू यांनी नुकतेच एका ट्वीटमध्ये सुशांत सिंग राजपूत यांचे नाव टीव्ही वाहिन्यांवरून अनेकदा ऐकल्याने डोक्याचा भुसा झाला आहे. दारिद्र्य आणि उपासमारीची समस्या आता उरलेली नाही. केवळ सुशांतसिंग राजपूत हीच समस्या आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीविषयी ट्विट करून त्यांनी विचारले की सुशांतसिंग राजपूत हे प्रकरण खरोखर इतके प्रासंगिक आहे का? मार्चपासून आतापर्यंत २ कोटी भारतीयांनी आपल्या नोकर्‍या गमावल्या आहेत पण कोणीही याबद्दल बोलत नाही.

विशेष म्हणजे सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी टीव्ही वाहिन्यांवर यावेळी विविध प्रकारच्या भाकडकथा दाखवल्या जात आहेत. परंतु देशातील वाढत्या गरीबी आणि उपासमारीमुळे दररोज लोक मरत आहेत. अलीकडे नोकरी गमावल्यामुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुशांतला न्याय मिळण्याऐवजी माध्यमे देशातील खरी समस्या लपविण्यात व्यस्त आहे असा आरोपही काटजू यांनी केला.
 

Post a Comment

0 Comments