बार्शी : सफाई कर्मचारी अशोक बबन अलाट याचा काल दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी मृत्यूला जबाबसदार बार्शी नगर परिषदेच्या प्रशासनाविरुद्ध आज आंबेडकरी समाज बांधव व कर्मचारी संघटना यांच्यावतीने आज ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बार्शी नगरपालिकेतील मृत अशोक अलाट याच्या कुटुंबातील वारसांना १५ दिवसाच्या आत सेवेत सामावून घेणे, तसेच मृत कर्मचारी अशोकच्या मृत्यूस जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी निवेदन स्वीकारल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले मुख्याधिकारी अमिता दगडे - पाटील यांनी दिले. तसेच कुटुंबातील वारसांना तात्काळ सेवेत सामावून घेऊ, कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करण्यासाठी रमाई आवास किंवा पंतप्रधान आवास योजनेतून लाभ मिळवून देण्याचे नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी यांनी सांगितले व ठिय्या आंदोलन संपवण्याची विनंती केली.
या आंदोलनात बार्शी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी, रिपाई नेते ऍड. अविनाश गायकवाड, रासप चे मक्रोज बोकेफोडे, युवक काँग्रेसचे निखिल मस्के, दलित महासंघाचे संदीप अलाट, सुनील अवघडे, बसपाचे प्रसन्नजित नाईकनवरे, बार्शी नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी पाठिंबा दिला यावेळी नगरसेवक कय्युम पटेल, विजय चव्हाण उपस्थित होते.
0 Comments