पबजीचे व्यसनाने१६ वर्षीय मुलाचा मृत्यू;लॉकडाउनमुळे लागलं ऑनलाइन गेमचं व्यसन



पबजी या गेमच्या नादात एका १६ वर्षीय मुलाला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. या मुलाला पबजी गेमचे व्यसन लागलं होतं. मागील अनेक दिवसांपासून तो केवळ गेम खेळत होता. त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला.

लॉकडाउनमुळे हा मुलगा मागील अनेक महिन्यांपासून घरीच होता. मात्र घरी वेळ घालवण्यासाठी त्याने ऑनलाइन गेम खेळण्यास सुरुवात केली आणि त्याला या गेमचे व्यसनच लागले. तो पबजी गेम खेळू लागल्यानंतर तर त्याने गेमसाठी अन्न पाण्याचाही त्याग केला. ह्या घटनेने खळबळ निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments